Daily Archives: डिसेंबर 16, 2011

शपथ शिवाची मोङू नकोस

इच्छा श्रीँची सोङू नकोस,
शपथ शिवाची मोङू नकोस,
हुतात्म्यांची स्वप्ने अशी पैँशासाठी विकू नकोस.
असेल देश गरीब आपला,
पण कचरा म्हणून हिणवू नकोस.
… … अरे आपली माती, आपली माणसं,
देश आपला विसरू नकोस.
अटकेपार झेँडे लाव,
पण माय मराठी सोडू नकोस,
¤ जय महाराष्ट्र ¤

                                                                                                                                 :-Tushar Wable

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

मी स्वप्नात देवाला विचारले

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………
तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???”

देव म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…..”

… … … मी म्हणालो “याचा अर्थ मी तुला आवडत नाही???”

देव म्हणाला, “तस नाही रे! तु पण मला खुप आवडतोस!”

मी म्हणालो, “मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे???”

देव म्हणाला, “तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे….

                                :- Ganesh Gite

Categories: कविता संग्रह | टॅग्स: | यावर आपले मत नोंदवा

तुझे माझे नाते

म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
कृष्ण, कृष्ण “करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

    Shared by :- Meghraj Sanap

Categories: कविता संग्रह | टॅग्स: | यावर आपले मत नोंदवा

का रे प्रेमात पडलास का ?

ती वेडी विचारते मला………………..
का रे प्रेमात पडलास का ?………..
कसे सांगू तिला ….
जेव्हापासून पाहिलंय तुला …………….
चैन नाही एक पल मला …………..
ती वेडी विचारते मला …………..
काय रे नाव संग न ?………………..
कसे सांगू तिला …………………
त्तुझेच नाव सांगायचं मला …………….
ती वेडी विचारते मला ……………………
खूप आवडते का रे ती तुला ?………….
कसे सांगू tila……………
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला ……………….
म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला ………….
ती वेडी विचारते मला …………..
का रे मग सांगणार कधी तू तिला ….?
कसे सांगू मी तिला ………………..
मला भीती वाटते तुजे नाव घ्याला ……………….
कारण जाशील का ग सोडून
मला एकट्याला ..?………..

                Shared By :

Categories: कविता संग्रह | टॅग्स: | १ प्रतिक्रिया

माझीच आहेस तू

प्रेम कधी नाही विचारतकि,”कोण आहेस तू ?”…………

ते फक्त म्हणते कि , “माझीच आहेस तू!!”

प्रेम कधी नाही विचारत कि,” कुठून आहेस तू ?” ……….

ते फक्त म्हणते कि ,” माझ्याच हृदयात राहतेस तू !!”

प्रेम कधी नाही विचारत कि, ” काय करतेस तू ?” ………..

ते फक्त म्हणते कि .”माझ्या हृदयाचीस्पंदने चालवतेस तू !!”

प्रेम कधी नाही विचारत कि,” का दूर आहेस तू ?” ………..

ते
फक्त म्हणते कि ,” माझ्याच जवळ आहेस तू!!”

प्रेम कधी नाही विचारत कि, ” माझ्यावरप्रेम करतेस का तू ?”…………. .

ते फक्त म्हणते, ” माझ संपूर्ण आयुष्याच आहेस तू!!”

                        Shared By : – Meghraj Sanap

Categories: कविता संग्रह | टॅग्स: | यावर आपले मत नोंदवा

त्या ओल्या केसांना

आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला …!!!

तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला …

बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला …

पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला …

बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला …

सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला …

कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला …!!!!

                    Shared By : – Ganesh Gite

Categories: कविता संग्रह | टॅग्स: | 3 प्रतिक्रिया

Create a free website or blog at WordPress.com.