सासू माझी…..(विडंबन)

सासू माझी.....(विडंबन) 

भांडलीय सख्ख्या शेजा-यांशी
भांडलीय अख्ख्या चाळीशी
डोळ्यात पाणी येईस्तोवर भांडलीय…
आगडोंब होऊन भांडलीय…
एक कळशी पाण्यासाठी…
रक्ताचं पाणी होईस्तोवर भांडलीय…!!१!!
.
.
.
भांडलीय घर मालकाशी
भांडलीय ही मोलकरणीशी
घश्याला कोरड पडेस्तोवर भांडलीय…
चक्कर येवून पडेस्तोवर भांडलीय….
स्वत:चच खर करण्यासाठी…
मुक्ताफ़ळं उधळीत भांडलीय…!!२!!
.
.
.
भांडलीय आप्त-स्वकीयांशी
भांडलीय येणा-या-जाणा-यांशी
तीचं तिला मिळावं म्हणून भांडलीय…
दुस-यांचही तिलाचं मिळावं म्हणून भांडलीय…
स्वार्थ सिध्दीस नेण्यासाठी…
महामाया बनून भांडलीय….!!३!!
.
.
.
भांडेल तिच्याच सासू-सास-यांशी
भांडेल स्वत:च्या नव-याशी
मुलाला मुठीत ठेवण्यासाठी…
भांडेल कड-कड सुनेशी…
तिसरा कोणी पडता मधे…
खरडमपट्टी काढत भांडेल….!!४!!
.
.
.
मृत्य़ू उभा ठाकता समोर…त्याच्याशीही भांडेल…
“तू येशील ये….तू नेशीलच मेल्या…ने !!”
पण इतक भांडण नक्कीच करेल…
डोळ्यात डोळे घालून म्हणेल…
वा.के.खा…वा.के.खा….(गोठ्यात वासरू केरसुणी खातेय हो !)
जाता जाता यमदूताशीही भांडेल…!!५!!
.
.
.
पण खरं सांगू ???
संसार फ़ुलवा म्हणून भांडलीय
फ़ूलत रहावा म्हणून भांडलीय
कोंड्याचा-मांडा करुन भांडलीय…
शिमग्यलाही दिवाळी गणून भांडलीय….
घरा-दाराच्या सौख्यासाठी ..
काट्यातली फ़ूलं वेचत भांडलीय !!६!!
-सुप्रिया.

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

पोस्टचे नॅव्हिगेशन

यावर आपले मत नोंदवा

Create a free website or blog at WordPress.com.