चांदण्या दोन

चांदण्या दोन बोलत होत्या एकमेकांशी ……………..

अग तो चंद्र आज गप्प धीरगंभीर का आहे

काल तर तो खूप रडत होता त्याला काय झाले आहे .
त्यावर दुसऱ्या चांदणी ने उत्तर दिले
अग तो बघ खाली त्या तिथे वेडा कवी बसलाय

रोज चंद्रावर कविता करत बसलेला असतो

त्याच्या जीवनी फार मोठा विरह आलाय

अगदी तसेच काल याची सुद्धा चांदणी निखळली ………….
फरक फक्त एवढाच कि ,त्याच प्रेम निर्दयी मुलीने नाकारलं

अन याच नियतीन निखळल

आता फक्त तो याच्यावर अन हा त्याच्यावर कविता करत बसतो

त्यामुळे तो बघताना धीरगंभीर भासतो .

===========================================Pavanputra Jakate

मराठी कविता कोश ۞Marathi

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

पोस्टचे नॅव्हिगेशन

यावर आपले मत नोंदवा

Create a free website or blog at WordPress.com.