झाडाला आधार देण्यासाठी चढताना

झाडाला आधार देण्यासाठी चढताना
तू पाय ठेवलास
तो नेमक्या दुख-या फांदीवर….
तुझे असहाय प्रेमळ डोळे दिसत असूनही
हातात नव्हतं फांदीला वाचवणं.
कोसळलीच होती ती!

पण विश्वास ठेव,
कोसळतानाही शक्यतोवर
तुझ्या डोक्यावर कोसळून तुला दुखापत हौ नये,
याची अतोनात काळजी घेतली होती.
….
झालं त्यात दोष कोणाचा?
तुझा, झाडाचा, की दुख-या ओल्या फांदीचा??
-कोणाचाच नाही.
मोकळ्या आकाशाच्या आभाळभर दुःखाला मात्र
फारसा पर्याय नाही.
थांबशील का रे ते दुःख बघायला?
की निघून जाशील असह्य असहायते पोटी??
….
मला माहित आहे,
एक दिवस हिरवी फांदी पुन्हा फुटेल
नवं गाणं पुन्हा सुचेल
उजाड आकाश पुन्हा कोवळ्या किलबिलाटानी भरून जाईल.

माझा विश्वास आहे रे,
माझ्या जीवनशक्तीवर
आणि
तुझ्या संजीवन बोटांवर!!

आसावरी
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

पोस्टचे नॅव्हिगेशन

यावर आपले मत नोंदवा

Create a free website or blog at WordPress.com.