माझी सासु …!

माझी सासु ...!
तशी माझी सासु गोड आहे


कडू कारल्याची फोड आहे
तशी माझी सासु गोड आहे

आंबट तिखट थोडे बोलणे
जखमेला मग मीठ चोळणे
जिभेवरचा मोठ्ठा फोड आहे
तशी माझी सासु गोड आहे

भलतेच वागणे असते कडक
बेधडक अशी खडबडी सडक
स्वभाव जरा विजोड आहे
तशी माझी सासु गोड आहे

म्यचिंग बांगड्या टापटीप साडी
कोलांट्या उड्या उगा लाडीगोडी
नव्या जुन्याचा जोड आहे ‘
तशी माझी सासु गोड आहे

रंगमंच रोज रोज सजवते
एकपात्री अभिनय छान रंगवते
सगळ्यांच्या तोडीस तोड आहे
तशी माझी सासु गोड आहे

सात मजली मोठ्ठे हसणे
सारखे सारखे रुसणे फुगणे
स्टार प्लसचा न संपणारा
अख्खा एपिसोड आहे
तशी माझी सासु गोड आहे


-मनिषा (माऊ )
दि .२४ .०३ .२०११
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

पोस्टचे नॅव्हिगेशन

यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com.