मिठीत यायच तर अशी ये.

मिठीत यायच तर अशी ये…………..
मिठीत यायच तर अशी ये
की दूजेपणाच भान सुटावं,
सुप्त मनाच्या वादल़ातुन
फ़क्त श्वासचं रान उठावं,

मिठीत यायच तर अशी ये
की मनानं मनात विरून जावं,
माझ्या श्वासानं जरा थांबून
तुझ्या श्वासात जगुन घ्यावं

मिठीत यायच तर अशी ये
की क्षणांनीही स्तब्ध व्हावं
खोल मनाच्या गाभाऱ्यातुन
आत्म्यानं मुक्त हुंकारावं …..

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

Happy Valentines’s Day !

आयुष्यात प्रत्येकाचं 
कोणावर तरी मन जडतं,
प्रेमहे असंच अबोल
नजरेतून न सांगता घडतं !

“Happy Valentines’s Day !”

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

एकटाच मागे जळत होतो

तुझ्या भासांच्या मागे 
एकटाच मी पळत होतो,
सर्व दिवे विझून गेले तरी
एकटाच मागे जळत होतो…!!!

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

कवि मन

प्रत्येक माणसामध्ये 
एक कवि
मन दडलेलं असतं
प्रत्येकाच्या आयुष्यात
काही ना काही घडलेलं असतं !!! 

- तेजस मोकाशी.


 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

का खंगले अशी मी?

होते तुझ्याचसाठी आधार प्रेम माझे
आता तुलाच करते बेजार प्रेम माझे!

का खंगले अशी मी? थकले उपाय सारे
कळले जरा उशीरा, आजार प्रेम माझे

मी लोचनात माझ्या रत्ने भरून आले
तुज वाटले तनाचा बाजार प्रेम माझे

म्हटले, विकून व्हावी सरणास सोय माझ्या
बाजारभाव म्हणतो, भंगार प्रेम माझे

अश्रू पिऊन हसणे शिकले हळूहळू मी
दु:खात वेदनेचा शृंगार प्रेम माझे

ना पेट घेत होती जेव्हा चिताच माझी
झाले अखेर जीतूअंगार प्रेम माझे

….रसप….
२९ जानेवारी २०१२

Ranjeet Paradkar

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग !!!

- तेजस मोकाशी (स्वत: लिखित).

 

 

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Join :  मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा.

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

उत्सव तीन रंगाचा

उत्सव तीन रंगाचा

आभाळी आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला

भारत देशाला मनाचा मुजरा

 

 

 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर यांना

विसरून चालणार नाही प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!!

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

तुझ्याविना तहानलेला

असला सागर पुढ्यात माझ्या 
तुझ्याविना तहानलेला राहील,
अमावास्येच्या दिवशीही सखे 
चंद्र तुझ्या डोळ्यांत पाहील…!!

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

 

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Join :  मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा.

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

रक्तच मराठी मराठी शिवाय जात लावत नाही

मरणाला घाबरणारे आम्ही नाही
नेहमी मरणच घाबरल हिम्मतीला मराठ्यांच्या
साक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांची
जिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूंच्या नरडीचा
संतांनी आमच्यावर संस्कार केले
शिवाजी राजांनी आम्हाला हिम्मत दिली
शंभूराजांनी शिकवला स्वाभिमान मराठ्याचा
जिजावूंनी पाजले बाळकडू वीरपुत्र घडवण्याचे
जीवावर उदार झाले मावळे मराठी मातीसाठी
रक्ताचा अभिषेक केला राजांनी स्वराज्यासाठी
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाही
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही
सह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही
आलाच जर कोणी आडवा उभा चीरल्याशिवाय सोडत नाही

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Join :  मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा.

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

 

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

नशीब माझं मी शोधतोय

नशीब माझं मी शोधतोय 
हातावरच्या रेषा पाहून…
जीवन प्रकाशमान करतोय 
अंधाऱ्या झोपडीत राहून…!! 

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
join मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

ते भासच होते सगळे…!

 

निघालो जरी सोबत
परी रस्तेच अपुले वेगळे
जगलो ज्या विश्वात 
ते भासच होते सगळे…!

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

 

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
join मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

ढग भरल्या आभाळातून


ढग भरल्या आभाळातून
पाउस पडो न पडो
त्याना ह्याचे काहीच घेणे देणे नसते
ह्यांच्या नळाला पाणी येतेय
तेवढेच त्याना पुरे असते …

शेतकर्याचे काय झाले ..?
शेतमजुरांचे काय झाले …??
कसा देशोधडीला लागलाय
ह्याना न काही घेणे देणे असते
दुष्काळी कामासाठी
ह्यांची सोय होतेय
तेवढेच त्यांना पुरे असते

कशी पोटासाठी येतात दुष्काळी प्रदेशातून
ही अर्धपोटी माणसे
कशी हवालदिल होऊन जातात
ही माणसे
ही पोरे ,ह्या बायका
दुष्काळी कामासाठी दीड दमडीने विकली जातात

कशी बळी पडते ह्या दुष्काळी भागातील
एखादी स्त्री
एखादी पोर ….
कधीतरी ह्यांचे बिंग फुटते, नाही असे नाही
पण हे पक्के बिलंदर असतात
हे अलगद नामानिराळे होतात

किती कनवाळू असतात ही मोठी माणसे
ह्याना घरात काम देऊन ह्यांच्या पोटाची
काळजी घेत असतात
महान महान म्हणवून ही घेत असतात
हे गेल्यावर ह्यांचे पुतळे उभारण्यास
हीच मंडळी घाम गाळीत असतात

ढग भरल्या आभाळातून
पाउस पडो न पडो
त्याना ह्याचे काहीच घेणे देणे नसते
ह्यांच्या नळाला पाणी येतेय
तेवढेच त्याना पुरे असते ..!

Sonal Sahane

मराठी साहित्य संमेलन

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

परत लहान व्हायचे आहे मला

आईचा कुरवाळणारा स्पर्श,
बाबांबरोबर शाळेत जाताना मिळणारा हर्ष..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला!

बहुला-बाहुलीचं लग्न,
भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला!

मामा-मामी च्या रम्या गावी,
सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..
परत लहान व्हायचे आहे मला,
ए राजी , ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला!

धाडसी शिवाजी महाराजांच्या गोष्टी,
आजोबांकडून ऐकायच्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत..
परत लहान व्हायचे आहे मला,
गर्क होऊन अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत मला!

नाचत खेळत वाहणारं नदीचं पाणी,
इवलेसे सगळे जण .. प्रत्येकाच्या आंघोळी..
परत लहान व्हयाचे आहे मला,
आजीला पूजे साठी घागर आणून द्यायची आहे मला!

आकाश्यात लुक लुक करणारे असंख्य तारे,
मध्या रात्रीचे ते मंद, हळूवार वारे..
परत लहान व्हयाचे आहे मला,
मोठी झाले की डॉक्टर होण्याची स्वप्न पाहायची आहेत मला!

नवीन वर्ष .. नवीन उल्हास,
नवीन गणावेश , नवीन वह्या -पुस्तकांचा वास..
परत लहान व्हायचे आहे मला,
परत शिस्तीत शाळेत जायच आहे मला!

आल्लड ते बालपण आता नाहीसे झाले,
आयुष्यातील सगळ्यात सुंदर आठवणी मात्र ठेऊन गेले..
परत लहान होता येणार नाही मला,
परत लहान होता येणार नाही मला!!

 

Ganesh Gite

मराठी साहित्य संमेलन

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

आयुष्याने किती खोल दुःख द्यावे


कशी आयुष्याची माझ्या गेली उसवत वीण
आता जगणे झाले रे किती कठीण कठीण
.
रोज सुटेल म्हणते माझ्या आयुष्याचा गुंता
वात विझेल थोडेसे तेल टाक भगवंता
तुला रडवून वाटे कसे भूषण भूषण
.
किती सहन करावे किती कडू घोट प्यावे
एखाद्याला आयुष्याने किती खोल दुःख द्यावे
असे जगणे नको रे बरे मरण मरण
.
आता समुद्राची कुशी बोलवते आहे मला
त्याच्या कुशीत झोपून शांत वाटेल जीवाला
नशिबात कदाचित आहे विझण विझण
.
.
तुषार जोशी, नागपूर
+91 98222 20365

मराठी साहित्य संमेलन

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

वयाच्या सत्तरीत सुध्धा प्रेयसीवर निरपेक्ष पणे प्रेम

एक नितांत सुंदर प्रेम कहाणी
♥♥♥♥♥♥
रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉनमाझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत घेतात. बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, बर्फ असो, त्यांच्या या प्रोग्रॅम मधे खंड पडलेला नाही. मधे त्यांची तब्येतबरी नव्हती तरी सुध्धा ते नीयमीतपणे येत होते. ते रोज गुलाबाची फुले घेतात म्हणजे नक्कीच आपल्या बायकोसाठी घेत असणार! त्यांचे त्यांच्या बायकोवर फारच प्रेम दीसते!
एक दीवशी जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी जॉन साहेबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तसे ते फार मीतभाषी. कधी कोणाशी फारसे बोलत नाहीत. पण त्यांचा मुड पण जरा वेगळा दीसत होता.
फुले कोणासाठी? बायकोसाठी वाटत!मी प्रश्न केला
बायको?” जॉनसाहेब क्षणभर गोंधळले व म्हणाले, ” नाही! मी अनमॅरीड आहे!
मघ ही फुले?” मी विचारले
ती माझ्या मैत्रिणीसाठी!जॉनसाहेब उत्तरले.
मैत्रीण?” मी जरा खोचकसारखे विचारले.
शाळेमधे असताना आमचे प्रेम प्रकरण होते. पण त्याला बरीच वर्षे झाली. मग तिचे लग्न झाले आणि मी अनमॅरीड राहिलो.सहज सांगावे तसे जॉनसाहबांनी सांगीतले.
तुमची मैत्रीण इथेच असते कां?” मी विचारले
हो इथेच असते, हॉस्पीटलमधे!जॉनसाहेब म्हणाले.
हॉस्पीटलमधे?” मी म्हणालो.
होय! गेली दहा वर्षे ती हॉस्पीटलमधे आहे. कार ऍक्सीडेन्टमधे तिचा नवरा गेला. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती स्मृती हरवुनबसली आहे. कोणाला ओळखत सुध्धा नाही. मी रोज सकाळी बरोबर नऊ वाजता तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो.जॉनसाहेब म्हणाले
पण ती तुम्हाला तरी ओळखते कां?”मी जॉनसाहेबांना विचारले
बहुतकरुन नसावी!जॉनसाहेब म्हणाले. तिला एव्हडेच ठाऊक आहे की रोज सकाळी नऊ वाजता कोणीतरी एक माणुस तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घ्यायला येतो. याची तिला येव्हडी सवय झाली आहे की जर एखाद्या दीवशी मी गेलो नाही तर ती दीवसभर उपाशी बसते.
जॉनसाहेबांच्या सामानाची पीशवी त्यांच्या हातात देताना मी त्यांना विचारले, ” पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे कां?”
ठाऊक नाही!सामानाची पीशवी उचलताना जॉन साहेब म्हणाले, “पण माझे तिच्यावर प्रेम आहे ना!
वयाच्या सत्तरीत सुध्धा आपल्या प्रेयसीवर निरपेक्षपणे प्रेम करणार्याल जॉनसाहेबांना बघुन माझे डोळे भरुन आले. माझे आश्रृ आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते की आणखी कशाचे होते माझी मलाच कळले नाही.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
join मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा

 

Top of Form

Categories: कविता संग्रह | 2 प्रतिक्रिया

Happy Makar Sankranti – 2012

मराठी साहित्य संमेलन

Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

तिची कविता

तिची कविता मी
माझ्या डोळ्यांत साठवून ठेवली
ओघळली नाही ती
तिला मी अगदी गोठवून ठेवली !

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

मराठी साहित्य संमेलन 

Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा

Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

तुझी पाऊल खुण…!!!

सागरात परतताना लाटांनी 
फेडलं होतं ऋण…
तू येताना वाळूत उमटली 
तुझी पाऊल खुण…!!!

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

 

मराठी चारोळ्या-Marathi Charolya

  

Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

डोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं

काळजात मूकपणे घोंगावणार वादळ,
अस्तित्वासाठी धडपडत ओठांपर्यंत येऊन थांबलं खरं..
पण तूझं अस्तित्व कुठे आहे?

याचं नेमकं उत्तर नाही सापडलं,
अस्तित्व ? सगळ्यांना असतं,

म्हणजे तुला देखील असायला हवं?
पण , पण कुठे शोधायचं ? नाहीच सापडलं तर

असंच मूकपणे घोंगावत रहायचं
डोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं, आणि

ओठांवर हसू फुलवत रहायचं !!!!

शिल्पा

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International. Fonts on this blog.