हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi

शहीद भगतसिंग सरदारचं होता….

टीप:- हा जोक वाचल्यानंतर
तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा,
कदाचित दुसर्यावर जोक
करताना नक्की विचार कराल…
.
सरदारी विनोद…..
.
काही तरूण
मित्रमंडळी दिल्ली पाहण्यासाठी जातात,
स्टेशनवरून ते एक रिक्षा करतात,
त्या रिक्षाचा ड्रायव्हर एक
वयोवृद्ध सरदार होता…..
.
रिक्षातून जात
असता त्या सरदारला चिडविण्यसाठी,
त्रास देण्यासाठी व
फिरकी घेण्यासाठी ती तरूण
मित्रमंडळी ‘सरदार
लोकांच्या बुद्धूपणावर असलेले’
विनोद सांगू लागतात,
पण
तो सरदार न चिडता हसून त्यांचे
जोक्स ऐकत राहतो…..
.
दिल्ली फिरून
झाल्यावर स्टेशनवर आल्यावर ते
सरदाराला रिक्षाचं भाडं देतात,
तो ते घेतो मात्र त्या पैशातून
तो त्या मित्रांना प्रत्येकी एक-एक
रुपया देतो…..
.
एक मुलगा विचारतो,
” पापाजी,
आम्ही सकाळपासून सरदारांवर जोक्स
मारत होतो व हसत होतो,
तरीही आपण आम्हाला एक-एक
रुपया बक्षिस देता आहात ते का ???
.
सरदार म्हणतो,
” मुलांनो तुम्ही तरुण
आहात,
तुम्ही मस्ती नाही करायची तर
कोणी करायची ?
पण
मी तुम्हाला हा एक
रुपया अशासाठी देत आहे,
की तुम्ही जेव्हा आपल्या गावी जाल
तेव्हा तुम्हाला जो सरदार
रस्त्यामध्ये भीक मागताना दिसेल,
त्याला हा रुपया द्या…..
.
तरूण आपल्या गावी येऊन
आता दोन पेक्षा जास्त वर्षे
झाली आहेत,
पण
त्या मुलांच्या खिशात
अजूनही रुपायाचं ते नाणं पडून आहे…..
.
कारण भीक मागणारा सरदार
त्यांना अजूनही दिसलेला नाही,
तर आपणही सरदारावर जोक्स
मारण्याअगोदर हा विचार
करा,
की सरदार काहीही काम करेल,
गॅरेज खोलेल, ट्रक चालवेल,
ढाबा चालवेल पण भीक कधीचं
मांगणार नाही…..
.
देशाच्या लोकसंख्येच्या १.४%
लोकसंख्या असूनही देशाला मिळणा-
या टॅक्सच्या ३५% टॅक्स
सरदारांकडून येतो,
देशाच्या सैनिकांमधील
त्यांची संख्या ५००००पेक्षा जास्त
आहे,
त्यांच्या लंगरमध्ये
खाना खाण्यासाठी
येणा-यांची जात
व धर्म विचारला जात नाही…..
.
अल्पसंख्यांक असूनही सरदार आरक्षण
मागत नाहीत,
देश स्वातंत्र्याच्या आंदोलनात
त्यांनी आपली जास्तीत जास्त मुलं
कुर्बान केली आहेत,
आणि त्या बदल्यात
काहीच मागितलं नाही…..
.
इतर धर्मवाले त्यांच्याकडून
काही शिकतील का ?
निदान सरदारांवर जोक्स करण्या अगोदर
हा विचार मनात येऊ द्या…..
.
की देश
स्वातंत्र्यासाठी फाशीवर
जाणारा शहीद भगतसिंग सरदारचं
होता….

Advertisements
Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | १ प्रतिक्रिया

एका ट्रिप ची गोष्ट

एका ट्रिप ची गोष्ट:-

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.

नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.

आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ”हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”बाहेरगावी जाणे रद्द.

नव-याने प्रेयसीला फोन केला, ”आपली भेट रद्द.

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ”माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.

आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ”माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता…

Sandip Asodekar

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | १ प्रतिक्रिया

बळवंतराव

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,” जाहिरातीत छापा “बळवंतराव आज सकाळी अचानक गेले.”
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली, तर छापा,”बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | यावर आपले मत नोंदवा

डॉक्टर

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | यावर आपले मत नोंदवा

सरदार सांतासिंग

सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?”

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही.”

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | 2 प्रतिक्रिया

भिकारी

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | यावर आपले मत नोंदवा

विमान प्रवास

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?”

पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | १ प्रतिक्रिया

आजोबां

सुरेशचा एका आजोबां सोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,”आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि……………..

सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,”हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , , , | यावर आपले मत नोंदवा

एक जानेवारी: एक संकल्प दिन !

एक जानेवारी: एक संकल्प दिन !

नव्या वर्षाचे स्वागत आपण हसतमुखाने करु या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाहीअशा नमुन्याचा किंवा सिगरेट सोडलीया चाली वर पावडर सोडलीहा थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प एक जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास) पुरुष मंडळींना मात्र असले-म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारु न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय एक जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही. एक जानेवारी पासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला दोन जानेवारीपासूनच फाटे फुटतात. 
पहिला फाटा : पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची. 
दुसरा फाटा : अर्धीअर्धी ओढायची. 
तिसरा फाटा : दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची. 
चौथा फाटा : रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही. 
पाचवा फाटा : फक्त जेवणानंतर ओढायची. 
सहावा फाटा : चहा व जेवणानंतर. 
सातवा फाटा : रात्री नऊऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही. 
आठवा फाटा : इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले 
तरी नो हार्म इज कॉजड् इ.इ. 

…’सिगरेट सोडणेया प्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे, अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे, योगासने करणे, जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रासिद्ध संकल्प आहेत. आम्ही दर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो… 

ते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रातिक्षा सुरु होते. हा नव्या संकल्पात कालमानाप्रामाणे जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करुन, वहीत नोंद करावी असे काही संसारोपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही. खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये… 

संकल्पाचा आनंद हा प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सद्गुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने
तृप्त राहायला काय हरकत आहे

तेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सद्गुणवर्धक संकल्प सोडण्याचा. तो सोडणार असल्याने चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारींपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प सोडायची जगातल्या इतक्या लोकांना जर हौस आहे तर एक जानेवारी हा संकल्प-दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करु नये? आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी दिनपाच-सहाशे असतील. दिनांच्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसतेहा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला? शिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही,’असे म्हणणेहे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे. 
तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण सत्य संकल्पाचा दाता भगवानअसे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोकेदुखी सुरु झाली नसेल तर- हसतमुखाने स्वागत करु या… 

साहित्यिक पु. ल.

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | यावर आपले मत नोंदवा

पुणेरी पाटया ” संस्कृतीचे आक्रमण”मॅकडोनाल्डसवर” झाले तर ?

1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५) 9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. – हुकूमावरून…

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | टॅग्स: | 9 प्रतिक्रिया

गुरुजी

Marathi Vinod

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi


गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले तीन किती ?

मक्या- गुरुजी, आठ ..!

गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?… . . . . . . . . . . . .

मक्या – बाकी….मजेत….!!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | टॅग्स: , | १ प्रतिक्रिया

‘सेटिंग’

Marathi Vinod

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi


एके दिवशी काय झाहले….

बोंबील म्हणाला सुरमाईला-

आय लव्ह यू, मी तुझ्यासाठी ‘वेटिंग’ आहे!!

सुरमई म्हणाली बोंबलाला-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

सॉरी, माझी बांगड्याबरोबर ‘सेटिंग’ आहे!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | टॅग्स: , | यावर आपले मत नोंदवा

झम्प्या

Marathi Vinod

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi


झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी : एम. जी. रोड

झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | टॅग्स: , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एक बाई

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली.

काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या.

दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला,” बघुन चाला हं.

बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल.”

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | टॅग्स: , | १ प्रतिक्रिया

एटी-केटी

एटी-केटी
दहावी-बारावीच्या मुलांच्या कपाळी
आता नापासाचा शिक्का बसणार नाही.
आषाढीबरोबर कार्तिकीच्या
वारीचाही कपाळी बुक्का बसणार नाही.

मुलांची वर्षॆ वाया जाऊ नयेत
म्हणून ही कल्पना तर भारी आहे !
नाहीतरी पहिली ते दहावीला
सध्याही ‘एटी-केटी’ च तर जारी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com.

%d bloggers like this: