Posts Tagged With: विनोद
बळवंतराव
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,” जाहिरातीत छापा “बळवंतराव आज सकाळी अचानक गेले.”पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.बायको म्हणाली, तर छापा,”बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.”
डॉक्टर
डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे. पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ? डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ? पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.
सरदार सांतासिंग
सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?” ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही.” सांता : कां ? ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !
भिकारी
आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे. बाईचा नवरा भिकार्याला १० रुपये देतो. बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ? नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !
विमान प्रवास
वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?” पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”
आजोबां
सुरेशचा एका आजोबां सोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,”आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि…………….. सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,”हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !”
झम्प्या
झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता? मुलगी : एम. जी. रोड झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!


ताज्या प्रतिक्रिया