केव्हातरी सांगेन मी

Tushar Joshi

केव्हातरी सांगेन मी
असती मलाही भावना
तोडून म्हणता वेचली
वाहून करता प्रार्थना

केव्हातरी सांगेन मी
की श्वास गुदमरतो कसा
शेंदूर हाराभिषेकही
ओझे मला ठरतो कसा

केव्हातरी सांगेन मी
असती कश्या या वेदना
तोडा जपुन सध्या तुम्ही
वर्षा रूतू हरवेल ना!

तुषार जोशी, नागपूर
+91 98222 20365
२१ नोव्हेंबर २०१०, १७:३०

     http://www.facebook.com/groups/marathi.kavitaa/

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

माझी सावळी मैत्रीण

Tushar Joshi

कशी तुला आवडते?

माझी सावळी मैत्रीण
रोज मला विचारते
गोरा तू मी सावळी रे
कशी तुला आवडते?

तिला सांगतो मी वेडे
करतेस काय अशी
तुझ्या सावळ्या रंगात
ओढ हवीशी हवीशी

तुझ्या असण्याने होते
माझे जगणे मंगल
तू नसता जग आहे
नको नकोसे जंगल

कस्तुरीला सुगंधाचे
जसे स्रोत नाही ज्ञात
तुझ्या सावळ्या रंगाचे
तुला मूल्य नाही ज्ञात

ईतकेच ठेव ध्यानी
तुझे सावळे असणे
माझ्यासाठी ठरते गं
जग मोहक देखणे

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
+९१ ९८२२२ २०३६५

मराठी कविता कोश ۞Marathi

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

एका ट्रिप ची गोष्ट

एका ट्रिप ची गोष्ट:-

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.

नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.

आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ”हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”बाहेरगावी जाणे रद्द.

नव-याने प्रेयसीला फोन केला, ”आपली भेट रद्द.

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ”माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.

आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ”माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता…

Sandip Asodekar

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | यावर आपले मत नोंदवा

नात्यांसाठी जगताना

Pushkar Mantri

असे कुणाशी नकळत
………
नाते जुळून जाते
चिंब होऊन ओली माती
……..
पाऊस गाणे गाते
गुंता मनमनांचा की
… ……..
ईश्वर-स ाक्ष
रेशीमगाठी
स्वप्नासाठी दिव्याचा
……….
प्रका श होऊन जळते
वाती
गंध असा हा
……….
काट्याचेही होऊन
जावे फ़ूल
नात्यांसाठी जगताना
……
स्वतःलाच
पडावी स्वत:ची भूल..

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

हसरे किस्से

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi

 

एकदा एक पंजाबी मुंडा मराठी मुलीला ( बहुधा rocking कोल्हापुरी मुलीला :P ) चिंधीगिरी करत प्रपोज
करतो ….

मुंडा: तुझमे रब दिखता है……….. यारा मै क्या करू ??

मुलगी: नरसाळ्या, दर्शन घे आणि फुडे जा !!

प्रियकर : प्रिये, तुझी आठवण आली, की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो
.
.
प्रियासी:मग, माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस,
.
… .
प्रियकर: मग काय, एका कुत्रिला दगड मारतो..

====================================================

गुरुजी : जबाबदारी म्हणजे काय..??

मन्या : तुमच्या पॅन्टच बटण तुटल्यावर चेनवर जी येत त्याला जबाबदारी म्हणतात.. :-D :-D

====================================================

मुलांची हुशारी
कॉलेज मध्ये एक नवी मुलगी शिकायला येते,

मुलगा: तुझं नाव काय आहे?
मुलगी: मला सगळे ताई म्हणतात.
… .
.
.
.
.
.
.
.
मुलगा: आईच्या गावात काय योगयोग आहे, मला सगळे जिजुम्हणतात… ;D

====================================================

मास्तरदोनातून दोन गेले..किती राहिले..

चम्यासर कळलं नाही..

मास्तरसमज तुझ्याकडे दोन पोळ्या आहेत..त्यातल्या दोन पोळ्या तू खाल्या..तर काय राहिला?

चम्प्याभाजी??

====================================================

नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?

नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो…….. !

====================================================

मुलगाकुल्फी वाल्याकडे जाऊन कुल्फी आहे का हो काका ??

कुल्फीवालाहो आहे.

मुलगाकितीला आहे.

कुल्फीवाला१० , २० , ३० , रु. ला कुठली देऊ

.
.
.
.
.
मुलगा कुल्फी खातो आणि काडी फेकून देऊन घराकडे प्रस्थान करतो ..

कुल्फीवालाअरे पैसे राहिले ना…………
..
..
मुलगाआई म्हणाली खा-प्या मजा करा पैशाचा लाड नाही ……

====================================================

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ?

====================================================

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

कुठलाही निर्णय घाईत घेवू नका

Sachin Waghmare

एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात
असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल
असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत…हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर
बघतो आणि पुन्हा …ओरडतो..बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत…
तेव्हा समोर
बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..
ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे
का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा
मुलगा जन्मापासूनच अंध
होता आणि त्याला दोनच दिवसांपासून
दिसायला लागले.
(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका… सत्य
कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

प्रेमाच्या सावलीत जगावं

Tejas Mokashi

बरोबर चूक ची गणिते न सोडवता 
सर्वांनी एकरूप होऊन जावं
एकमेकांच्या सहवासात नसलो तरी
प्रेमाच्या सावलीत जगावं !

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

फुकट्या , मागे वळून काय बघतोस ?

Kiran Dabhade

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली ,

म्हणून तो हॉटेल शोधत होता.

तेवढ्यात त्याला पाटी दिसली.

त्यावर लिहिलं होतं , ‘ जेवणाची उत्तम सोय

जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .

एकावर लिहिलं होतं शाकाहारी

तर दुसर्यावर मांसाहारी

तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये आणखी दोन हॉल होते.

डावीकडे पाटी होती , ‘ भारतीय बैठक

तर उजवीकडे , ‘ डायनिंग टेबल

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती रोख

तर दुसर्यावर उधार

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.

वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली

तो अचंबीत झाला .

त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच

त्याला खिजवायला ,

फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही.

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

फेसबुक वापरणाऱ्यांसाठीकाही सूचना :-

अतुल शिंदे

  • फेसबुक वापरणाऱ्यांसाठी
    काही सूचना :-

    १) भूकंप झाल्यास त्वरित घराबाहेर
    पळा, फेसबुक वर status update
    करायलाउभे आयुष्य आहे (जर
    वाचलात तर ).

    २) मुलगी पाहायला गेल्यास
    तिला “तुझे फेसबुक account आहे
    का ?” असा मागास प्रश्न विचारू
    नका. यातून ती फेसबुक वर आहे
    कि नाही हे समजण्यापेक्षा,
    तुम्ही किती उतावळे आहात हे दिसते.

    ३) इकडून तिकडून post ढापून
    टाकण्यापेक्षा, स्वतः लिहा.
    फुकटात तुमचे लेखन प्रसिध्द
    करणारे असे लोकप्रिय ठिकाण
    दुसरे नाही , तसेच कितीही भंगार
    लिहिले, तरी ते संपूर्णपणे वाचणारे इथे पुष्कळ महारथी आहेत.

    ४) एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा -
    तुम्हाला दारूची सवय असेल तर
    ती एकवेळ सुटणे सोपे आहे , पण
    फेसबुकचे व्यसन सुटणे अवघड.

    ५) दारू सोडण्यासाठी बुलढाण्याला
    एका मांत्रिकबाबाकडे नेतात , परंतु
    पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व
    मांत्रिक मात्र मागास असल्याने , फेसबुकचे व्यसन
    सोडविणारा एकही मांत्रिक
    या महाराष्ट्रात नाही….!! :-D :-D

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा

मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा

अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा …

आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही

तो मेला आहे…त्याचा हट्ट धरायचा नाही …

आग विझल्यावर मग थोडी जवळ जा

कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा

सव्तःला सांग व्हायच ते होउन गेलं

वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ..

Tushar Wable


मराठी कविता कोश ۞Marathi

 

 

Bottom of Form

  •  

    ““`

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

सरांची छडी अन शाळेचा डब्बा

Ganesh Gite

मला ते दिवस हवे आहेत …..

सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे …
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ….

दिवसभर चिंचा ,कैऱ्या पाडत उनाडक्या करायच्या …
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आईकडे Icecream साठी हट्ट करायचा …
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा …
मला ते दिवस हवे आहेत ….

पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे …
मित्रांची निर्मळ मैत्री असायची
कदाचित ती स्वार्थी नसायची …
मला ते दिवस हवे आहेत ….

एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गंमत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची …
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत … .

आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रत्येक दिवस नवीन सुख आणायचा …
माझ्या लाडिक बोलण्याचे सर्वाना कौतुक असायचे ..
आणि माझ्या हुशारीचे बक्षीस मिळायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ….

आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचाकडूनच कळायचे ..!!!!..

मराठी माणूस जागा हो

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात पडली

Ganesh Gite

एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात पडली…
तिने त्याला प्रपोस पण केल…
पण मात्र

चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त
उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच
उडु शकतेस…
मग चिमनीने त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले…

नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस
घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात
संसार करायला लागले…

पण..
मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,
त्या वादळात चिमना हळु-हळु करून उडुन
गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे
ती उडु शकली नाही…

नंतर वादळ शांत झाल्यावर चिमना आला
आणि
त्याने बघितले कि चिमनि मरून पडलेली होती
आणि तिने फांदीवर लिहिले होते कि
एकदा बोलला असतास कि मी परत येणार आहे तर
मी वादळाशी हि लढले असते रे..”

 

मराठी माणूस जागा हो

Categories: कविता संग्रह | 4 प्रतिक्रिया

प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारांची परीक्षा घ्यावी

Deepak Pawal

प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारांची परीक्षा घ्यावी राज ठाकरे यांची अपेक्षा

व्हिडिओकॉन प्रस्तुत लोकमतच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादेत सोमवारी आयोजित कविसंमेलनात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. समोर श्रोत्यांनी खचाखच भरलेला लोकमत लॉन.
औरंगाबाद। दि. २ (लोकमत ब्युरो)
आपण जिथे जायला निघालो आहोत, तिथले सामान्यज्ञान आवश्यक आहे. म्हणून मी मनसेतर्फे मुंबई मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतली. अर्थात, ही काही आयएएस, आयपीएस पद्धतीची परीक्षा नव्हती. सामान्यज्ञान तपासून घेणारी परीक्षा सर्वच पक्षांनी घ्यावी, अशी अपेक्षा आज लोकमत औरंगाबाद महोत्सवात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 
व्हिडिओकॉन प्रस्तुत लोकमतच्या ३0 व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून या महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवाची सुरुवात कविसंमेलनाने झाली. राज ठाकरे यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून या कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून ठाकरे यांनी अभिवादन केले. आकाशात सोडलेले फुगे व्यासपीठाच्या पाठीमागे असलेल्या अशोकाच्या झाडाला लटकले. त्यावर अशोका म्हणजे काँग्रेस. नुसतेच वाढत जाते. फूलही येत नाही आणि सावलीही देत नाहीअशी उत्स्फूर्त टिपणी करताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही. 
कवींनी मोजकेच प्रश्न विचारले.. 
या कविसंमेलनातील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे आणि किशोर कदम यांनी राज ठाकरे यांना मोजकेच प्रश्न विचारले व त्याला राजशैलीत ठाकरे यांनी उत्तरे दिली. त्यातला पहिला प्रश्न उमेदवारांच्या परीक्षेचा किशोर कदम यांनी विचारला होता. मुंबईचे शिल्पकार कोण, या प्रश्नाच्या उत्तरात एकाने सचिन तेंडुलकर असे लिहिले होते, असे राज ठाकरे यांनी सांगताच पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. एकट्या मुंबई मनपाचा अर्थसंकल्प २१ हजार कोटींचा आहे. केरळसारख्या राज्याएवढय़ा अर्थसंकल्पाच्या शहराचे नेमके प्रश्न काय, ते सोडवावे कसे हे कळले पाहिजे, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. असा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
आपण साहित्य व सिनेशौकीन आहात. कधीतरी आपण कार्टून फिल्म काढणार काय, या किशोर कदम यांच्या प्रश्नाच्या उत्तरात राज उत्तरले, अँनिमेशन फिल्म काढणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे. ते करिअर मानूनच करावे लागेल. मग त्यासाठी मला राजकारण सोडावे लागेल. काटरून फिल्म काढणे आणि राजकारण करणे हे एकसाथ शक्य नाही; पण पुढे मागे मी फिल्म मात्र बनवू शकेन. ते मला आवडेल. मग मला त्यात भूमिका करायला आवडेल, असा हजरजबाबीपणा किशोर कदम यांनी दाखविला. 
एकहाती सत्ता द्या..
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपला पक्ष जाहीरनामा प्रकाशित करणार का? असा प्रश्न कवी अशोक नायगावकर यांनी विचारला. राज ठाकरे म्हणाले, अर्थातच; पण मला एकहाती सत्ता द्याल तर शंभर टक्के प्रश्न सुटू शकतात. गुजरातमध्ये एकहाती सत्ता आहे, तिथे विकास झाला. 
बिहारमध्ये नितीशकुमारांच्या एकहाती सत्ता दिली, तर तिथे विकास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही हे घडू शकते. जनतेने ठरविले तर नव्हत्याचे होते व होत्याचे नव्हते होऊ शकते. (टाळ्या) 
ज्येष्ठ वातट्रिकाकार रामदास फुटाणे यांनी महाराष्ट्रात पुढे- मागे पुणे पॅटर्न राबविण्यात येण्याची शक्यता आहे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी सांगितले की, पुणे पॅटर्न फेल आहे; पण हे करण्याची गरज काय? नालायक निघाला तर त्याला बाजूला करा, दुसर्‍याला संधी द्या. पुणे पॅटर्न म्हणजे काही डिझाईन पॅटर्न नाही. 
मी फटकळ आहे, उद्धट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले व एक टोला अजित पवार यांना लगावला. कोकणात काय करायचे ते निवडणुकीच्या वेळी पाहूृ. तूर्त नारायण राणे यांना बोलू नका, असा सल्ला दिला आहे, असे राज म्हणाले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांनी केले. त्यात त्यांनी लोकमतच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन लोकमत हे वाचकांचे दैनिक असल्याचे सांगितले. यावेळी राज ठाकरे यांचे स्वागत ऋषी दर्डा यांनी केले. 
अशोक नायगावकर यांचे स्वागत समूह संपादक दिनकर रायकर यांनी, रामदास फुटाणे यांचे स्वागत निवासी संपादक चक्रधर दळवी यांनी, गुरू ठाकूर यांचे स्वागत लोकमत समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी, किशोर कदम यांचे स्वागत लोकमतचे वृत्तसंपादक श्रीकांत भराडे यांनी, निवेदक अरुण म्हात्रे यांचे स्वागत लोकमत टाइम्सचे वृत्तसंपादक के. एम. जोसेफ यांनी केले. यावेळी मनसेचे आ. बाळा नांदगावकर यांचे स्वागत ब्युरो चीफ नजीर शेख यांनी, तर अतुल सरपोतदार यांचे स्वागत चक्रधर दळवी यांनी केले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई लोकमतचे ब्युरो चीफ अतुल कुलकर्णी यांनी केले. कविसंमेलनासाठी रसिक- श्रोत्यांची अफाट गर्दी झाली होती. 
जवाहरलाल दर्डा यांची आठवण..
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची आठवण काढली. मार्मिकचे काम करीत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे एक जबाबदारी सोपविली होती. मार्मिकचा अंक आणि मिठाईचा बॉक्स घेऊन काही मान्यवरांना मला भेटायला सांगितले होते. त्यावेळी मी जवाहरलाल दर्डा यांच्या घरी मुंबईत भेटलो होतो. अत्यंत आस्थेवाईकपणे माझी त्यांनी चौकशी केली होती. ती माझी पहिली आणि शेवटची भेट होती. नंतर विजयबाबू आणि राजेंद्र दर्डा यांचा स्नेह वाढला. आता ऋषी दर्डा आणि करण दर्डा यांच्याशी मैत्री आहे आणि लोकमतचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सहसा मी टाळत नाही. म्हणून आज मी मुद्दाम आलो.

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

निघुनी का गेलास तू?

Vijay Tehare

रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!

रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरेस्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?’

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

प्रत्येक क्षणी सहवास हवा

Shilpa Nitin

क्षण तुझे नकोत मजला 
प्रत्येक क्षणी सहवास हवा 
तुझ्यासवे हि पहाट हसली 
ल्यायली निशा हि साज नवा 
साज नवा लेऊन निशा हि 
ऐसी गाफील राहिली 
हलकेच डोकावली पहाट अन 
सोनेरी हि सकाळ झाली !!!

 

Categories: चारोळी संग्रह | 2 प्रतिक्रिया

सातारा……..


बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे सातारा,

माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे सातारा,

राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे सातारा,

दादागिरी मधे काटा किर्रर् सातारा,

गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे सातारा, …….

राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे सातारा,

मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे सातारा,

सगळ्या जगाला हेवा वाटावा असा माझा लई भारी सातारा…..!!!!

Abhijeet Bhosale

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

हसणं आणि रुसणं….

डोळ्यांत जरी असले अश्रू
तरी इतरांसाठी हसावं लागतं
आशेच्या उजेडात कधी कधी
निराशून रुसावही लागतं !
- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).
Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

डोळ्य…

डोळ्यांत जरी असले अश्रू

तरी इतरांसाठी हसावं लागतं….

आशेच्या उजेडात कधी कधी

निराशून रुसावही लागतं….

 

- तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

चांदण्या दोन

चांदण्या दोन बोलत होत्या एकमेकांशी ……………..

अग तो चंद्र आज गप्प धीरगंभीर का आहे

काल तर तो खूप रडत होता त्याला काय झाले आहे .
त्यावर दुसऱ्या चांदणी ने उत्तर दिले
अग तो बघ खाली त्या तिथे वेडा कवी बसलाय

रोज चंद्रावर कविता करत बसलेला असतो

त्याच्या जीवनी फार मोठा विरह आलाय

अगदी तसेच काल याची सुद्धा चांदणी निखळली ………….
फरक फक्त एवढाच कि ,त्याच प्रेम निर्दयी मुलीने नाकारलं

अन याच नियतीन निखळल

आता फक्त तो याच्यावर अन हा त्याच्यावर कविता करत बसतो

त्यामुळे तो बघताना धीरगंभीर भासतो .

===========================================Pavanputra Jakate

मराठी कविता कोश ۞Marathi

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

धन्य–धन्य शिवाजी भोसला

मराठी साहित्य संमेलन

धन्य–धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।

राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।

यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥
… …
विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।

झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।

सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥

पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।

झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।

मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।

पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।

शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।

असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥

खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।

एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।

कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥

जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।

तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।

टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।

शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥

भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥

शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥

क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥

तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥

शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।

ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।

ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।

असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥

शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥

दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥

शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।

मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।

एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।

असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥

शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।

गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥

थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।

हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।

मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥

आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।

मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।
=================================BY Malhari Khalate

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.