केव्हातरी सांगेन मी
असती मलाही भावना
तोडून म्हणता वेचली
वाहून करता प्रार्थना
केव्हातरी सांगेन मी
की श्वास गुदमरतो कसा
शेंदूर हाराभिषेकही
ओझे मला ठरतो कसा
केव्हातरी सांगेन मी
असती कश्या या वेदना
तोडा जपुन सध्या तुम्ही
वर्षा रूतू हरवेल ना!
तुषार जोशी, नागपूर
+91 98222 20365
२१ नोव्हेंबर २०१०, १७:३०


I like this type poems very nice!!!!!!