एका गृहस्थाला सपाटून भूक लागली ,
म्हणून तो हॉटेल शोधत होता.
तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ‘ जेवणाची उत्तम सोय ‘
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ‘ शाकाहारी ‘
… तर दुसर्यावर ‘ मांसाहारी ‘
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ‘ भारतीय बैठक ‘
तर उजवीकडे , ‘ डायनिंग टेबल ‘
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती ‘रोख‘
तर दुसर्यावर ‘उधार‘
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली
तो अचंबीत झाला .
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच
त्याला खिजवायला ,
‘फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही.‘



ताज्या प्रतिक्रिया