तुझ्या पासून दूर होताना
डोळ्यात पाणी आलं
तू दुसऱ्याची ऐकून
काळजाचं पाणी झालं…
मला माहित आहे कि
तू तुझ्या मनाची राणी आहेस
पण तुला माहित नाही कि
तू माझ्या डोळ्यातलं पाणी आहेस
विसराव तुला म्हणतो
पण होत नाही मन
तू दुसऱ्याची आहेस म्हंटलं
तर जात नाही क्षण…
खरंच आहे का ते वाक्य
जे ऐकले मी या कानांनी
विश्वास बसत नाही
तू दिलेल्या या धोक्यांनी ..


ताज्या प्रतिक्रिया