माझ्यासाठीच ये

पुन्हा एकदा परत ये
आणि येशील तेंव्हा फक्त ….
माझ्यासाठीच ये ,

जर कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,

त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,

कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना
पूर्ण करायला फक्त एकदाच ये ,

सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच ना माझ्याकरिता पण देवाने सातजल्मासाठी बांधलेली कुणी …

जरी बांधलो गेलो असलो आपण सातजल्मासाठी,
तरी आठवा जल्म घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ,

कदाचित म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते पूर्ण करायला फक्त एकदाच ये…
——————————————————————By Malhari Khalate

मराठी साहित्य संमेलन

 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.