संसदेत लोकपालवर चर्चा तर मुंबईत अण्णांचं उपोषण

संसदेत लोकपालवर चर्चा तर मुंबईत अण्णांचं उपोषण

नवी दिल्ली : उद्यापासून मुंबईत अण्णा हजारेचं तीन दिवसांचं उपोषण सुरू होत असताना लोकसभेत सरकारने सादर केलेल्या लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेचं थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर पाहता यावं यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनने अण्णांच्या उपोषण सुरू असलेल्या MMRDA मैदानावर मोठ्या एलसीडी स्क्रीनची सोय केली आहे. 

लोकापाल आणि लोकायुक्त विधेयक 2011 यावर उद्या संसदेत दिवसभर चर्चा होणं अपेक्षित आहे. तसंच लोकपालाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी घटनादुरूस्ती विधेयकावरही उद्याच संसदेत सादर होणार आहे. 

तसंच व्हिसलब्लोअर विधेयक म्हणजेच सरकारी भाषेत पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर अँड प्रोटेक्शन टू पर्सन मेकिंग द डिस्क्लोजर विधेयक 2010 यावरही उद्याच संसदेत चर्चा होणार आहे. या विधेयकानुसार कुणालाही गोपनीय माहिती लोकहितार्थ उघड करता येणार आहे, तसंच ही माहिती उघड करणाऱ्यांना सरकार सुरक्षा पुरवणार आहे. 

काँग्रेसने यापूर्वीच आपल्या खासदारांना या सर्व तीनही विधेयकांवरील चर्चेसाठी उपस्थित राहण्याचा आणि विधेयक संमत होण्यासाठी मतदान करण्याचा पक्षादेश जारी केला आहे. काँग्रेसने यूपीएतील आपल्या सहयोगी पक्षांनाही अशा प्रकारचा पक्षादेश आपापल्या खासदारांसाठी जारी करण्याचं आवाहन केलंय. 

सरकारने संसदेत सादर केलेल्या लोकपाल विधेयकामुळे लोकपाल यंत्रणेची स्थापना आणि राज्या राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती करता येणार आहे… लोकपाल आणि लोकायुक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या नेते तसंच सरकारी कर्मचाऱ्यांविरूद्धची भ्रष्टाचाराविरूद्धच्या प्रकरणांची सुनावणी करता येणार आहे. 

सरकारने संसदेत सादर केलेल्या या विधेयकाला भाजपसह अनेक पक्षांनी आक्षेप घेतला आहे. लोकपालामध्ये 50 टक्के आरक्षण अल्पसंख्याकांसाठी ठेवण्याचा निषेध भाजपने केला आहे. लोकपाल विधेयकात अनेक घटनाबाह्य तरतुदी सरकारने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

तर काही राजकीय पक्षांनी केंद्र सरकारने लोकायुक्त विधेयक संमत करणं म्हणजे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचा आरोप केला आहे. तर काही पक्षांनी या लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानांचा समावेश करण्याला आक्षेप घेतला आहे.

तर लोकपालाची मागणी पहिल्यापासून लावून धरणाऱ्या अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारने सादर केलेलं विधेयक कमकुवत असल्याचा आरोप करत त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णांचं आंदोलन उद्यापासून तीन दिवस मुंबईत एमएमआरडीए मैदानावर उपोषण आणि त्यानंतर जेलभरो असं राहणार आहे. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अलीकडेच सरकारी यंत्रणेतला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी लढाई करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांनी अलीकडेच पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना सरकारने सादर केलेल्या तीन विधेयकामुळे भ्रष्टाचाराचा भस्मासूर समूळ निपटून काढण्यासाठी मदत होणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. 

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.