व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी…..?
मेघराज पाटील

व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी? ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन आहे..
तर पुढील वर्षी येणाऱ्या 3 (THREE) किंवा थ्री किंवा तीन या सिनेमातील हे गाणं आहे. धनुष म्हणजे रजनीचा जावई या सिनेमाचा हिरो तर कमल हसनची पोरगी श्रुती हसन हिरोईन… रजनीची मुलगी ऐश्वर्या धनुष या सिनेमाची निर्माती आहे. हे गाणं रेकॉर्ड झाल्यावर ते कुणास ठाऊक कसं इंटरनेटवर लीक झालं, तशी अनेक गाणी इंटरनेटवर लीक होतात. तसं हेही झालं, आणि या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी या गाण्याचे हक्क असलेल्या सोनी म्युझिकने मग फक्त हे एकच गाणं इंटरनेटवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अजूनही बाजारात या सिनेमाच्या म्युझिक सीडी किंवा अन्य काही लाँच झालेलं नाही. तुम्हाला हे गाणं फक्त इंटरनेटवरच ऐकता येऊ शकेल.
आतापर्यंत तब्बल 21,66,307 नेटीझन्सनी हे गाणं सोनीच्या ऑफिशियल पेजवर पाहिलंय. या गाण्याची कॉपी करून ते वेगवेगळ्या चॅनेलवर शेअर करणारांची संख्या तर अफाट आहे. तब्बल 21 लाखांपेक्षाही जास्त लोकांना वेड लावणारं किंवा गुणगुणायला लावणारं हे गाणं सध्या इंटरनेटवरील एक परवलीचा शब्द बनलंय. फक्त तामीळनाडूच नाही तर संबंध भारत वर्षात, सर्व प्रकारचे भाषेचे अडथळे ओलांडून या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडलेत.
चेन्नईच्या दी हिंदू या दैनिकाने आज कोलावेरी कोलावेरी डी या गाण्याची, त्याच्या लोकप्रियतेची बातमी पहिल्या पानावर छापलीय. ही बातमी सर्वांनी वाचावी अशी तर आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाच्या आहेत, त्या इंटरनेट एडिशनवर संबंधित बातमीवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया… तरूणांनी कोलावेरीची बातमी पहिल्या पानावर छापण्याचं स्वागत केलंय, तर काहीं सीनिअर सिटीझन्सनी ही बातमी पहिल्या पानावर देण्याचा निषेध केलाय. एकाच बातमीवर किती परस्पर टोकाच्या प्रतिक्रिया येऊ शकतात, हे याचं चांगलं उदाहरण.. एवढंच नाही तर तरूण आणि म्हातारे यांच्यातली दरी किती रूंदावते आहे, याचंही एक निदर्शक आहे… काहींनी म्हटलंय की ते पन्नास वर्षांपासून हिंदूचे वाचक आहेत, पण असा थिल्लरपणा त्यांनी यापूर्वी कधी अनुभवला नाही, तर काहींनी या गाण्याला विरोध असतानाही, केवळ हिंदूने पहिल्या पानावर कोलावेरीचा लेख छापलाय म्हणून ते एकलं आणि त्या गाण्याच्या प्रेमात पडले… सारच काही विलक्षण आहे…
या गाण्याचे शब्द बघा… म्हणजे ऐका, लक्षपूर्वक.. किंवा सहज ऐकलं तरी चालेल… गुणगुणावसं वाटेल… लगेच.
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
रिदम करेक्ट….
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
मेन्टेन धिस….
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
डिस्टन्स ला मोनू मोनू मोनू कलरू व्हाईटू…
व्हाईट बॅकग्राऊंड नाईटू नाईटू
नाईटू करलू ब्लॅकू…
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाईटू स्किनू… स्किनू… गर्ल.. वू.. गर्लू…
गर्लू… हर्टू.. ब्लॅकू…
आईज.. यू… आईज यू… मीट यू… मीट यू…
माय फ्यूचर डार्क यू… डार्कू…
मम्मा, नोट्स इदुथूको…
आपडिये कैला स्नॅक्स.. इदुथुको…
पा… पा… पां… पा… पा… पां… पा… पा… पां…
सारिया वासी…
सुपर मामा रेडी…
रेडी 1… 2… 3… 4…
व्हाआ… वॉटआ… अ चेंज ओव्हर मम्म्मा…
ओ के, मम्म्मा, नाऊ ट्यून चेंज यू…
कैला ग्लास ओन्ली इंग्लीश…
हँड ला ग्लास…
ग्लास ला स्कॉच…
आईज यू फुल्ल्ल्ल, आ आ आ… टीअर यू…
एम्टी लाईफ यू…
गर्ल यू.. कम यू…
लाईफ रिवर्स गियर यू…
लव यू, लव यू… ओ माय लव यू…
यू शोड मी बो यू…
काऊ यू काऊ यू… होली काऊ यू…
आय वॉन्ट यू… हिअर नाऊ यू…
गॉड, आय एम डाईंग नाऊ यू…
शी इज हॅपी, हाऊ यू…
धिस साँग फॉर सूप बॉईजू … यू
वुई डोन्ट पॅव चॉईसू… यू..
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
फ्लॉप साँग…
य्यो बॉईज आय एम सिंगिंग साँग…
सूप साँग..
फ्लॉप साँग..
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
रिदम करेक्ट….
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
मेन्टेन धिस….
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
अनिरूद्ध रविचंद्र या दक्षिणेतल्या संगीतकाराने हे गाणं संगीतबद्ध केलंय. तर गायलंय स्वतः धनुशनेच शिवाय या गाण्याचे बोलही त्याचेच आहेत. या गाण्याचे प्रोमो 19 नोव्हेंबर 2011 ला पहिल्यांदा यूट्यूबवर अधिकृतपणे अपलोड करण्यात आले. म्हणजे त्यापूर्वीच या गाण्याने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली होती. ही लोकप्रियता कॅश करण्यासाठी अधिकृतपणे हे गाणं इंटरनेटवर रिलीज करण्यात आलंय.
या सिनेमाची दिग्दर्शक असलेल्या ऐश्वर्या धनुषला या सिनेमासाठी खास तरूणाईने गच्च भरलेलं, उडत्या चालीचं आणि हलकं फुलकं… सहज गुणगुणता येईलसं गाणं हवं होतं… तशी हिरोच्या प्रेमभंगाची सिच्युएशनही या गाण्याला आहे. या सगळ्याच्या फ्यूजनमधून या गाण्याची चाल आकाराला आली, तीही अवघ्या दहाच मिनिटात… असं कंपोजर अनिरूद्ध रविचंद्र सांगतो. त्यानंतर अवघ्या वीसच मिनिटातच या चालीवर तोडक्या मोडक्या इंग्लीशमध्ये आणि तमीळमध्ये म्हणजेच तिंग्लिशमध्ये धनुषने त्या चालीसाठी शब्द बसवले… झालं की गाणं तयार…
या गाण्याचा गायक आणि गीतकार… धनुष सांगतो, की तसं पाहिलं तर हे गाणं बाथरूमध्ये गुणगुणावं असं आहे, हलकं.. फुलकं.. हल्ली तसा प्रत्येकाचाच कधी कधी ना हार्ट ब्रेक झालेला असतो. त्यामुळे सर्वांनाच हे गाणँ रिलेट करेल, असं त्याला वाटलं… आणि गाणं चक्क सुपर डुपर हिट झालं… म्हणजे एका गंमतशीर आणि केवळ परिस्थितीजन्य गाण्याने एक विश्वविक्रम केलाय.
या गाण्यात असलेल्या तमीळ शब्दाचे काही तमीळ शब्दांचे अर्थ असे आहेत…
कोलावेरी : विश्वासघात, जीवघेणा
सूप साँग : प्रेमभंगाचं गीत
सूप बॉईज : प्रेमभंग झालेले तरूण
शो मी बोवू यू.. : प्रेमात नाकारलेला
हे गाणं अधिकृतपणे इंटरनेटवर रिलीज झाल्यानंतर म्हणजे 16 नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच म्हणजे 21 नोव्हेंबरला ट्विटरवर # kolaveri हा टॅग सर्वाधिक प्रसारित होणारा टॅग ठरला.
एवढंच नाही तर जागतिक संगिताच्या लोकप्रियतेच्या क्रमवारीत आता हे गाणं तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय आणि लेडी गागाच्या अल्बमला टक्कर देतंय….
आजवर भारतातल्या शेकडो वृत्तपत्रांनी या गाण्याचं विश्लेषण करणारे आणि त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य उलगडणारे लेख लिहिलेत… पण गाणं ऐकणाऱ्यांना हे असलं काहीच वाचावसं न वाटताही थेट गाणंच ऐकावं वाटतं…
म्हणजे सध्याच्या भाषेवरून मारामारी होण्याच्या किंवा थेट मुडदे पडण्याच्या काळात एक तमीळ गाणं, भारतासारख्या खंडप्राय देशात राज्याराज्यांच्या सीमा ओलांडून लोकप्रिय होतंय… राजकीय विश्लेषक ज्याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात, ती यापेक्षा वेगळी असते का?
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी…..?


ताज्या प्रतिक्रिया