किती वाट बघायची तुझी सखे

 

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…;)

                            Amol Kodgire 

Categories: कविता संग्रह | 2 प्रतिक्रिया

Post navigation

2 thoughts on “किती वाट बघायची तुझी सखे

  1. Ganesh Paralkar

    I read this it’s nice…..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.