आतुर जीव
धरेला आस ,
तहान जिवास ,
तुझ्या प्रेमास ,
आतुर जीव… ll
पोटाला चिमटा ,
पायाला काटा ,
भुकेला वाटा ,
कशा देऊ?… ll
धरनिचा बाळ ,
ओढवेल काळ ,
डोळ्यांत जाळ ,
पेटलासे… ll
तुह्या आशेवर ,
कर्जाचा भार ,
जिवितांचे सार ,
शेतकरी… ll
आता जगावे कसे ,
लागेल पिसे ,
पलटती फासे ,
जिवावरी ….ll
कोठे लपवू जीव ,
कोणा येइल किव ,
मह्या पिलांची चिव चिव ,
जीव घेई… ll
आता धरवेना तग ,
धरणी माते जाग ,
बाळ मरतो ग हाक ,
पोटाशी घे,….ll
- स्वरदा…


ताज्या प्रतिक्रिया