ती – बाई होती
मी – आई होते
ती – दाई होती
मी – माई होते
ती – कष्ट करणार
मी – निवांत बसणार
ती – जाऊ का विचारणार
मी – काम सांगणार
ती – पगार मागणार
मी – चुका सांगणार
ती – काकूळती होणार
मी – फ़क्त ऑर्डर करणार
ती – मुलांना जीव लावणार
मी – मुलांना ओरडणार
ती – जाउदेत ताई
मी – त्यांची आहे आई
ती – सहन करते
मी – डाफरते
ती – दाई आहे
मी – आई आहे
- स्वरदा


ताज्या प्रतिक्रिया