ओबामाची माशीमारी
मारून मारून काय तर?
ओबामाने एक माशी मारली
हे मात्र विचारू नका,
ती ब्रेकींग न्यूज कशी ठरली?
मरणारापेक्षा मारणारा
इथे महत्त्वाचा ठरला गेला !
एका माशीचा मरणसोहळा
सार्या जगात फ़िरला गेला !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)


ताज्या प्रतिक्रिया