सासू सासू सासू म्हणजे सारख्या सूचना !

सासू सासू सासू म्हणजे सारख्या सूचना !
सून सून सून म्हणजे अहो सूचना नको ना !!

सासू ला सून कधी का गं ! कळलीच नाही ?
का ? सासू सूने साठी कधी रडलीच नाही

सासू बाई सासू बाई भलतेच रसायन
सासू जन्मा येते ! जशी सून होत जाते जून

प्रत्येक सूने मधे आहे दडलेली सासू
जसे फार हासताना येती डोळ्यातून आसू

सासू सूनेचे मागणे आहे जुळ्याचे दूखणे
नवा नग “एक “घेता – पूर्व पश्चिम पहाणे

माझा सासरा कळेना ! कसा सोसतो सासूला
म्हणे “खाण तशी माती”सोस तू माझ्या लेकीला

-मयुरेश साने..
.दि…२४-मार्च-११
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.