सासू लई ग्वाड
सासू म्हणजे काय ?
सारख्या सूचना,,,
सुनेला कंटाळा येईल इतक्या..
सून म्हणते–
सासूबाई, सूचना नको…
काम करू का ऐकत बसू ?
मुलाकडे कोण बघणार ?
इकडे आड तिकडे विहीर…
ती जन्मदात्री,ही अर्धांगिनी …
बिच्चारे सासरे,
खिशात ठेवत आले कापसाचे बोळे,
मारून मुटकून चेहरा खुलवणारे…
तशी हिची सासू लई ग्वाड बर का ?
….अरविंद


ताज्या प्रतिक्रिया