या सख्यानो या
बघा बघा कशी माझी सून वागते
ऐकून घेते
हळू हळू कशी कानडोळा करते
डोळे फिरविते
नकाराची भाषा चेहर्यावरून बोलते
बघा बघा ते
फजिती माझी करून गालात कशी हसते
मला वाटते
हिचे बाई वेगळेच नाटक चालते
सदा भांडते
सदा हट्ट करुनी लेका पळवते
शहाणी कशी
माहेरची माणसे सगळी हवीहवीशी


ताज्या प्रतिक्रिया