मना सज्जना सासू ऐशी असावी….

मना सज्जना सासू ऐशी असावी....
जगी गोड सासू अशी कोण आहे ?
विचारी मना तूची शोधूनी पाहे
जिच्या कौतुके जावया धाप लागे
तिचे पाद दोन्ही कुठे सापडावे ?

जिची सून स्तोत्रे म्हणाया थकेना
गुणांच्या मण्यांच्या गळा सात माळा
जिच्या एक शब्दी मिळे स्वर्ग सारा
अशी थोर सासू जगी दाखवा ना !

जगी जीस येती कराया चहाड्या
गुणां भागुनी दोष येती गुणाया
गणितात ऐशा गती थोर जिला
“सासू” उपाधी मिळे मात्र तिला !

परी अंतरी एक ध्यानी धरा रे
सासू अखेरीस माणूस आहे
तिच्या ह्या “गुणां” नेत्र काणा करावा
तिचा शब्द प्रत्येक हृदयी धरावा !

पतीला म्हणे जी “तुझी थोर आई”
अशी सून अन्ती पसंतीस येई
जिला जावई खुद्द घेऊन येतो
तिला “प्यार” होतो, जगी धन्य होतो !

मना ऐक रे मीही होणार सासू
कुणाला दिसावे तिचे नम्र आसू ?
उद्याची तयारी अताला करावी
जगी एक सासूच हाती धरावी.

शिकाव्या तिच्या चार युक्‍त्या-प्रयुक्‍त्या
तिला दोन गोष्टी मजेशीर द्याव्या
जगी थोर पुण्याई घेऊन आला
मिळे गोड सासू जगी ह्या तयाला !!

–प्रभा.
२४.०३.२०११.
.
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.