तशी माझी सासू फ़ार गोड आहे !

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !
.
.
.
‘हे’ रत्न हिच्या पोटी कसं ?
…….एक मोठं कोडं आहे,
कारण ……….

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !
.
.
.
ती शांत तर हा घुमा…
ती माउली थोर…घरादारा हा घोर…
तीच्या शांततेला विचारांची जोड आहे..

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !
.
.
.
हिच हसणं…..सनईचे सूर…
ह्याच रुसण…..विझत्या निखा-यातला धूर…
तीच्या ह्र्दयात जरी माजलेलं काहूर आहे..

तरी माझी सासू फ़ार गोड आहे !
.
.
.
हिची होते सा-यांसाठी तड्फ़ड…
छोट्या छोट्या गोष्टीवरुन ह्याची कडकड…
तिच्याकडे मात्र या सा-याची नामी तोड आहे…

तशी माझी सासू फ़ार गोड आहे !


-सुप्रिया.
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.