घनघोर काळोखात, बुडली आज पहाट

घनघोर काळोखात, बुडली आज पहाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट

तूटले सगे जीवाचे, तूटली सारी नाती
भर दुपारीस मजला, भासे भयान राती
शोधीत फिरते वेडी, चुकले कुठे मी वाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट

डोळ्यात उभी माझ्या, भेडसावीत निशा
विस्कटून गेल्या कुठे, सार्‍या दाही दिशा
पाउल कुठे माझे, अंधार झाला धनदाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट
शोधू कुठे तुला मी, लपलास कुठे तान्हा
कंठात शोक भारी, उरात फुटला पान्हा
डोळ्यात उसंत नाही, वाहती अश्रुंचे पाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट

नियतीने कसा आज, उधळून टाकला डाव
खवळलेल्या समिंदरात, फुटली माझी नाव
कशी कुणा द्वाडाची, संसारा लागली नाट
कोणा कसे न कळले, आली कुठून लाट

-हरीश दांगट

March 20, 2011
Categories: कविता संग्रह | Tags: | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.