माणूस

माणूस

टोचणा-या पावसाच्या सुयांनी झोडपलस,

कोळपून जाऊस्तोवर ग्रीष्माचे दाह दिलेस,

बोचणा-या थंडीत पानापानांना ओरबाडत राहिलास…

पण मी अजुन उभाय,

येणा-या – जाणा-याला सावली देत,

अन् सा-याच निर्वासितांना..

माझ्या खांद्या-फ़ांद्यांचा आसरा देत…


अन् म्हणे तुच चालवतोस सा-यांचा योगक्षेम!!


अरे तुलाही केव्हाच बसवलाय तुझ्याच भक्तांनी,

माझ्याच बुंध्याच्या सावलीला…

शेंदुर फ़ासून!!!
========================
-सारंग भणगे. (18 मे 2009)
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.