…जपशील ना?

.....जपशील ना?
मोठ्या फणका-याने…..
तुला सोडुन निघाले होते!
पण
थाम्बले, वळले, पाह्यलं, जाणवलं….
माझ्या मनातला एक रेशिम धागा
तुझ्या ठायी गुंतला होता!
तो धागा-
सोडवणं जमेलसं वाटत नाही
तोडणं माझ्या स्वभावात नाही!
पुढे जाणं तर अटळ आहे
तेव्हा आता-
त्या धाग्यासोबत माझं थोडं मन ठेवते
जातांना तुला सांगुन जाते-
“आपल्या वेड्या सखीचं
भाबडं मन जीवापाड जप!….
…..जपशील ना?
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.